जिल्ह्यात कोरोनाचे ४ बाधित रुग्ण

दिवसभरात ६ बाधितांनी कोरोनावर केली मात
जिल्ह्यात कोरोनाचे ४ बाधित रुग्ण

जळगाव | प्रतिनिधी jalgaon

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या Corona interrupted संख्येत घट होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे चार बाधित रुग्ण आढळून आला आहे. तसेच दिवसभरात ६ बाधितांनी कोरोनावर मात केली असून ११ तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी आहे.

जिल्ह्यात बुधवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये Corona interruptedजळगाव ग्रामीण १, भुसावळ १, अमळनेर १ तर चोपडा १ असे एकूण ४ बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच जळगाव शहर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव मुक्ताईनगर, बोदवड या ११ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या १ लाख ४२ हजार ६१३ एवढी झाली आहे.

दुसरीकडे ६ रुग्ण कोरोनामुक्त Corona free झाले आहे. १ लाख ३९ हजार ९७६ एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात ६२ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण District Surgeon Dr. Nagojirao Chavanयांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com