भुसावळ प्रतिनिधी bhusawal

रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दि.२९ रोजी ३८ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्यांना रेल्वेतर्फे तत्काल १० कोटी ५ लाख ७५ हजार ६५० रुपये त्यांच्या खत्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारे वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवा कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन खंडवा, अकोला, भुसावळ, पाचोरा, चाळीसगांव, बडनेरा, अमरावती आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पीपीओ फोल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना डिआरएम विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.डी.गांगुर्डे यांनी कर्मचार्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल मनोेगत वक्त केले.

आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेन्द्र वडनेरे यांनी केले. यशस्वितेसाठी सेटलमेंट, लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.