36 वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव

36 वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील घटना

Rajendra Patil

पारोळा - प्रतिनिधी Parola

तालुक्यातील तरवाडे येथील रणजीत दिलीप पाटील (वय 36) याने दि.27 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना लहान भाऊ महेंद्र यास मी शौचास जातो असे सांगून गेला असता बराच वेळ होऊनही रंजीत हा आला नसल्याने महेंद्र हा गावाजवळच त्यांच्या शेतात त्यास पाहण्यासाठी गेला असता रणजित हा पळसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन लटकलेला दिसला.

यावेळी महेंद्र याने आरडाओरड केली असता गावातील नामदेव कौतिक महाजन, रोहिदास सरदार पाटील, पिंटू भगवान पाटील, पोलीस पाटील राजपाल चौधरी यांनी त्यास खाली उतरून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर योगेश साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले.

याबाबत महेंद्र दिलीप पाटील राहणार तरवाडे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार जयवंत पाटील हे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com