चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंती दिनाचे औचित्य साधून, शहरातील शिक्षक भारती संघटनेतर्फे तालुक्यातील ३७ आदर्श महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा,उर्दु विभाग, विनाअनुदानित अशा सर्व विभागातील महिला शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

छोटेखानी झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी युगंधरा फाऊंडेशन अध्यक्षा स्मिता बच्छाव, स्वयंदिप फाऊंडेशन अध्यक्षा मिनाक्षी निकम, चाळीसगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी कु.स्नेहा फडतरे, डॉ.नरेंद्र पाटील(मुंबई), गटशिक्षणाधिकारी विलास भोई, भरत शेलार, राजेंद्र दिघे, नारायण वाघ, सोमनाथ पाटील, शितल जडे, सौ.लता खलाणे आदि उपस्थित होते.

यावेळी स्मिता बच्छाव, मिनाक्षी निकम, स्नेहा फडतरे, विलास भोई, भरत शेलार, सोमनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आलेख मांडला.

तसेच डॉ.नरेंद्र पाटील यांनी शिक्षक भारतीच्या सावित्री-फातिमा कशलेस योजने संदर्भात विस्तृत माहिती दिली, गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पुरस्कार मिळाल्यामुळे महिला शिक्षिकांची जवाबदारी वाढली असे सांगून आता अधिक चांगले काम करुन घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला.