छाया- राजेश निकम, फेकरी
छाया- राजेश निकम, फेकरी
जळगाव

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले

तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Rajendra Patil

२४ दरवाजे पूर्ण उघडले

आज दुपारी 4 वाजता 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे तर 12 दरवाजे अर्धामीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून 69121 क्युसेस वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

भुसावळ - Bhusaval

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे दि.१ वाजता हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.

उघडण्यात आलेल्या दरवाज्यातून ३० हजार ५१६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येत असल्याने तापी नदीला पुर आला आहे.

धरणाच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. त्यामुळे दुपार पर्यंत धरणाची पाणी पातळी २०९.४८० मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणाचा जलसाठा १७९.६० दलघमी इतका आहे.

तापी नदी पात्रात ३० हजार ५१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे भुसावळ येथे तापी नदीची पाणी पातळी १७४.७०० मीटर इतकी नोंद करण्यात आल्याची माहिती येथील केंद्रीय जल आयोगाच्या सुत्रांनी दिल आली. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यावर्षी लॉकडाऊनमुळे रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र बंद असल्यामुळे जास्त वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने धरणात सध्या जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर तालुक्यातील ३८ हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com