चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज दत्त जयंतीच्या मुहूर्ताला एकाच वेळी गर्दी होवून तब्बल ६३० अर्ज दाखल करण्यात आले. परंतू एकाच वेळी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्यामुळे सर्व्हरचा वेग मंदावला व डाऊनही झाले. उद्या अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मूदत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यत एकूण ७४२ अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुरुवार पर्यंत आठ अर्ज दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवस सुट्टी असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होती. त्यामुळे पुन्हा सोमवापासून अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची एक गर्दी उसळलेली दिसून आली. सोमवारी इच्छुकांचे तब्बल १०४ अर्ज दाखल झाले. तर आज मंळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्त साधत एकाच वेळी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होवून, तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांचे तब्बल ६३० अर्ज दाखल झालेे.

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियासाठी इच्छुक व ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे येथील तहसील कचेरीच्या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. एकीकडे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरताना अडचण येत आहे. दुसरीकडे राखीव जागावर निवडणूक लढवणार्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ते निवडणूक लढवत असल्याबाबतचे शिफारस पत्र तहसील कार्यालयाकडून दिले जाते, त्यामुळे ते घेण्यासाठी देखील गर्दी झाल्याचे दिसून आले. मंळवारी तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी ६३० अर्ज दाखल झाले आहेत.

तर आतापर्यंत ७४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३० तारखेपर्यंत मुदत असल्यामुळे आज अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार असून इच्छुकांचा अर्जांचा पाऊसच पडणार आहे.