पहिल्यांदाच एकाचवेळी ३१६ पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आदेश
पहिल्यांदाच एकाचवेळी ३१६ पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती

जळगाव - Jalgaon

जिल्हा पोलीस दलात आज पहिल्यांदाच एकाचवेळी ३१६ कर्मचार्‍यांच्या पदोन्नती झाल्या आहेत. या पदोन्नतीचे जंबो आदेश आज डॉ. प्रवीण मुंढे यांनी पारित केले आहेत.

या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीनाईक, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार व सहाय्यक फौजदार याप्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार म्हणून ९४, पोलीस हवालदारपदी १०० व पोलीस नाईकपदी १२२ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com