अबब...सलग ट्रिपल सेंच्युरी
जळगाव

अबब...सलग ट्रिपल सेंच्युरी

एकाच दिवसात ३०५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेत नसतानाच शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णांची ट्रिपल सेंचूरी झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 305 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या 7275 इतकी झाली असून आतापर्यंत 371 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 52, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 28, अमळनेर 4, चोपडा 20, पाचोरा 26, भडगाव 25, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 48, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 9, बोदवड 9 तर परजिल्ह्यातील 1 असे एकूण 305 रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी एकूण 183 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पर्यंत जिल्ह्यात 371 कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2486 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यापैकी 316 रुग्ण अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी मृत्यू झालेल्यांमध्ये एक जणांचा मृत्यू जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात तर 12 जणांचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झालेला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 40 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष तर 70 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यातील 50 व 70 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 62 व 75 वर्षीय पुरुष तर 59 व 60 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 58 व 64 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com