जिल्ह्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण

दिवसभरात 2 रुग्ण कोरोनामुक्त तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 27 वर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात काही महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या corona sufferers संख्येत घट होत असल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण newly infected patients आढळून आले आहे. तसेच 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची Inactive patients संख्या 27 वर पोहचली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. सोमवारी अमळनेर 1, चोपडा 1 तर जामनेर 1 असे एकूण 3 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 12 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 685 एवढी झाली आहे. दुसरीकडे 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

1 लाख 40 हजार 83 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 27 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण District Surgeon Dr. Nagojirao Chavan यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com