चाळीसगावात नव्याने २८ करोना पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगावात नव्याने २८ करोना पॉझिटिव्ह

१० जणांची करोनावर मात

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगावात कोरोनाबाधितांचा आकड दररोज वाढतच आहे. आज नव्यान २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. तर १० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनग्रस्तांची संख्या ४४५ वर जावून पोहचल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. हि आकडेवारी काल रात्री उशिरा व आज सायंकाळपर्यंतची आहे. दररोज वाढणार्‍या पॉझिटीव्ह रुग्ण संख्या शहरासह तालुक्याची धोक्याची घंटा आहे. नव्याने आढळुन आलेल्या २८ पॉझिटिव्हमुळे तालुक्यात संध्यास्थिती कोरोना बाधितांचा आकडा हा ४४५ असून आतापर्यंत २८ जणांचे बळी गेले आहेत. तर १७१ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. २४६ रूग्ण उपचार घेत आहेत.

सध्या दररोज पॅाझिटीव्ह येणार्‍या संख्येचा विस्फोट होत असला तरी रूग्णांसाठी बेडची कमतरता जाणवणार नाही अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी दिली. शहरात भडगाव रोडवरील अंधशाळेतील कोविड सेंटरमध्ये ५५ बेडची व्यवस्था करण्यात आली असून धुळे रोडवरील डॉ. उत्तमराव महाजन वैद्यकीय महाविद्यालयात १०० ते १५० बेडची व्यवस्था आहे.

तसेच नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ट्रामा केअर सेंटरमध्येही कोविड सेंटर प्रस्तावित आहे. तर लोकसहभागातून अत्याधुनिक कोविड सेन्टरसाठी आमदारसह इतर लोकांनी मदत केली आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज असे, ऑक्सीजनची सुविधा असलेले कोविड केअर सेन्टर कार्यान्वीत होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com