हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

६७ हजार ३९० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावधतेचा इशारा

जळगाव-Jalgaon

हतनुर प्रकल्पातून 67 हजार 390 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून, पाणलोट क्षेत्रात 29.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 4 वाजता 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परिसरात 29.4 पावसाची नोंद झाली असून, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवार दि.30 रोजी सकाळी 4 वाजता हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 67 हजार 390 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात

असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या आवकेमुळे पातळीत वाढ होत असून आतापर्यंत गेल्या चोवीस तासात 12.28 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच बाहेरच्या क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत सतत वाढ होत आहे. हतनूर प्रकल्प पाण्याची पातळी 209.500 मिटर असून 187.80.मिमी क्युबिक आहे.

दि.30 जुलै रोजी सकाळी 4 वाजता 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून प्रकल्पातून 67 हजार, 390 क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com