<p><strong>जळगाव - Jalgaon</strong> </p><p>जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण संख्या चोपडा तालुक्यात वाढत असल्याने दि.२२ ते २४ मार्च दरम्यान तालुका क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आलेल्याचे परिपत्रक प्रांताधिकारी चोपडा यांनी काढले आहे.</p>.<p>बंदच्या काळात सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार, किराणा दुकाने, किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी, विक्री, शैक्षणक संस्था, क्लासेस, हॉटेल, सभा, मेळावे, गार्डन आदी बंद राहील. तर अत्यावश्यक सेवा दूध, मेडीकल सुरू राहील.</p>