चाळीसगाव : पोलीस अधिकाऱ्यासह २२ जण पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगाव : पोलीस अधिकाऱ्यासह २२ जण पॉझिटिव्ह

बाधितांचा एकूण आकडा ६७०

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgan - प्रतिनिधी :

तालुक्यात कोरोनाबाधितांचा संख्या दिवसेदिवस वाढत आहे. सोमवारी शहरासह तालुक्यातील विविध भागातील तब्बल २२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

त्यात मेहुणबारे येथील एक पोलीस आधिकारी व कर्मचार्‍याला देखील कोरोनाची लागन झाल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.

गेल्या पाच ते सात दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने त्या आधिकार्‍याने आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात आतापर्यंत बाधितांचा आकडा हा ६७० च्या वर गेल्या असून आतापर्यंत जवळपास ३५ जणांचे बळी गेले आहेत. तर २७० वर रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच ३६२ वर रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com