जळगाव : जिल्ह्यात आढळले २०८ पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले २०८ पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 8004

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह 208 रुग्ण आढळले. यात जळगाव शहरात तब्बल 68 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 8004 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 68, जळगाव ग्रामीणमधील 4, भुसावळ येथील 10, अमळनेरातील 34, पाचोरा येथील 8, भडगावातील 6, धरणगावातील 3, यावलमधील 3, एरंडोल येथील 8, जामनेरातील 23, रावेर येथील 1, पारोळ्यामधील 28, चाळीसगावातील 11, मुक्ताईनगरामधील 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 5051 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2553 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 400 रुग्ण दगावले आहेत. यातील 9 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 4, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 3, 1 रुग्ण मुक्ताईनगर व 1 रुग्ण चाळीसगाव येथे मयत झाला. मृतांमध्ये जळगाव शहरातील 58वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 65, 66 व 72 वर्षीय पुरुष, मुक्ताईनगर तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com