जिल्ह्यात पुन्हा आढळले 205 करोनाबाधित
जळगाव

जिल्ह्यात पुन्हा आढळले 205 करोनाबाधित

एकूण रुग्णसंख्या झाली 10249

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 205 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 10249 इतकी झाली आहे. 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.

मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात 7, जळगाव ग्रामीण भागात 18, भुसावळमधील 20, अमळनेरातील 8, चोपडा येथील 5, पाचोरा येथील 13, भडगावातील 8, धरणगावमधील 25, यावल येथील 7, एरंडोलमधील 4, जामनेरातील 9, रावेर येथील 20, पारोळ्यातील 1, चाळीसगाव येथील 6, तर परजिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 6736 रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील 231 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3032 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 481 रुग्ण दगावले. यात 12 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील 6 रुग्णांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर 6 रुग्णांचा मृत्यूृ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 80 व 97 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 45 व 65 वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील 55 व 75 वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष, मुक्ताईनगर तालुक्यातील 70 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com