चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

राज्यात बंदी असलेले प्लास्टिकच्या कॅरीबग चाळीसगाव शहरात सर्रासपणे विक्री होत आहे. नगरपरिषदेच्या पथकाकडून वेळोवेळी जप्तीची कारवाई करण्यात येते.

परंतू तरी देखील शहरात ५० मायक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग व इतर वस्तूची विक्री होत असल्याने नगर परिषदेच्या पथकाडून पुन्हा मंगळवारी बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणार्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शहरातील विविध दुकानाची तपासणी करण्यात आली.

यात प्लास्टिक कॅरीबॅग विक्री करणारे दुकानदार प्रमोद कोतकर व सुनील जैन या दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

ही कारवाई न.पा.च्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल, सचिन निंकुभ, दिलीप चौधरी आदिनी केली आहे.