अतिरेक्यांकडून विमान अपहरणाचा तब्बल 2 तास सिनेस्टाईल थरार

जळगाव विमानतळावर मॉकड्रील : सुरक्षा यंत्रणांसह इतर विभाग अलर्ट असल्याची परीक्षा
अतिरेक्यांकडून विमान अपहरणाचा तब्बल 2 तास सिनेस्टाईल थरार

जळगाव । Jalgaon प्रतिनिधी

भोपाळहून औरंगाबादकडे जाणार्‍या विमानाचे अपहरण, जळगाव विमानतळावर अतिरेक्यांकडून विमानाची लँडींग Aircraft landing, पाच लाख युएस डॉलर्सची मागणी....त्यानंतर सुरक्षा यंत्रणासह विविध विभागांची बैठक, अतिरेक्यांना Terrorist जेरबंद करण्यासाठी नियोजन आणि सुरक्षा यंत्रणांकडून अतिरेकी जेरबंद...असा तब्बल दोन तासांचा सिनेस्टाईल थरार हा जळगाव विमानतळावर अनुभवण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हे मॉकड्रील Mockdrill असल्याच्या सुचनेनंतर सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरी विमानतळ सुरक्षा ब्युरो, नागर विमानतळ, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार विमान अपहरण उपहास सराव बुधवारी जळगाव विमानतळावर यशस्वीरित्या पार पडला.

हा सराव आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: विमान अपहरण Hijacking होण्याच्या स्थितीमध्ये सुरक्षा संबंधित एजन्सी यात महाराष्ट्र पोलीस टीम, बॉम्ब शोध व डिस्पोजल पथक, एअरलाईन्स, Airlines राज्य गुप्तवार्ता विभाग, गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन सेवा, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भारत दूरसंचार विभाग, वनविभाग यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि प्रतिसाद याची तपासणी करण्यासाठी केला जातो.

या संपूर्ण सरावाचे संचलन प्रविण महाजन, अपर जिल्हाधिकारी, चंद्रकांत गवळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, श्री. ए. चांडक, श्री. कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक भा. पो. से. प्रताप शिकारे, पोलीस निरिक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन MIDC Police Station यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी संपूर्ण सरावाचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण केले.

यावेळी डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जितेंद्र महाजन, हर्षल महाजन, निलेश वतपाल, अश्पाक पिंजारी, संदीप महाजन, अमोल पंडीत, मौजोदीन शेख, विमानतळावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सरावानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली रिव्हुव्ह मिटींग झाली. व त्यामध्ये पूर्ण सराव सत्राच्या त्रुटी व सूचना यांची चर्चा करण्यात आली. त्या सुधारण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com