जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ

संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजुरी
जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

चौथ्या तिमाहीतील (ट4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजुरी देऊन जाहीर केले.

कंपनीतून पूर्ण 2021 आर्थिक वर्षात 525 कोटी रूपयांची निर्यात केली. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे स्त्रोत भक्कम आहे. कंपनीच्या उत्पादनांना भारतात आणि जगात खूप मागणी आहे कारण कृषीक्षेत्रात चांगली वाढ याही वर्षी होईल. एकल कामकाजातील खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता 10 टक्क्यांनी वाढली. तसेच कंपनीचे एकत्रित निव्वळ कर्ज 416 कोटी रूपयांनी घटले आहे. कंपनीच्या कर्ज निराकरणाच्या बाबतीत सातत्याने प्रगती झाली आहे.

अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

चौथ्या तिमाहीतील जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 19.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली.2021 या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न 5666.9 कोटी रूपयांवर पोहोचले आणि एकल उत्पन्न 2156.4 कोटी रूपये नोंदवले.एकत्रित कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन चौथ्या तिमाहीत1 टक्क्यांवरून 11 टक्के इतका वाढला आणि आर्थिक वर्ष 2021चा 21 5टक्क्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत वाढला.

एकत्रित कर व्याज घसारापूर्व नफा 468 कोटी नोंदला गेला आणि एकल करव्याजघसारापूर्व नफा 165.2 कोटी रूपयांवर पोहेचला आहे.चौथ्या तिमाहीतील एकत्रित करपश्चात नफा 63.9 कोटी रूपये झाला आणि एकल करपश्चात तोटा 22.2 कोटी रूपये होता.

आर्थिक वर्ष 2021 चा एकत्रित करपश्चात तोटा 368.7 कोटीवर पोहेचला आणि एकल करपश्चात तोटा 307.32 कोटी रूपये झाला.जागतिक मागणी पुस्तकात 4190 कोटी रूपयांच्या ऑर्डर्स असल्याची माहिती संचालक बैठकीत देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com