जि.प.मालकीचे १८ गाळे घेतले ताब्यात

पोलीस बंदोबस्तात सीईओंच्या पथकाची कारवाई
जि.प.मालकीचे १८ गाळे घेतले ताब्यात

जळगाव - Jalgaon

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील (Pushpalta Bendale Chowk) जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मालकीचे १८ गाळे जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील (CEO Dr. BN Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरीक्त सीईओ कमलाकर रणदिवे, (CEO Kamlakar Ranadive) बांधकाम विभागाचे प्र.कार्यकारी अभियंता नंदू पवार,उपअभियंता सतीश सिसोदिया, जळगावचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे,जि.प.चे कायदेशिर सल्लागार ऍड.हरुल देवरे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात गाळे खाली करुन ताब्यात घेण्याची कारवाई गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पथकाने केली.

सन २००३ पासून जि.प.मालकीचे १८ गाळे अनाधिकृतपणे गाळेधारकांनी ताब्यात ठेवले होते. या गाळ्यापोटी जिल्हा परिषदेला भाडे सुद्धा देत नव्हते आणि गाळे खाली करीत नव्हते. याबात वारंवार सूचना देवूनही गाळेधारक दाद देत नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. यासंदर्भात जि.प.न. न्यायालयात दावा करीत न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाला दिला होता. जिल्हा परिषदेने कायदेशिर लढाई जिंकूनही गाळेधारक जुमानत नसल्याने जि.प.ने पोलीस बंदोबस्तात १८ गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com