जिल्हा कारागृहातील १८ बंदी करोनाबाधित
जळगाव

जिल्हा कारागृहातील १८ बंदी करोनाबाधित

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव- Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणार्‍या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देण्यासाठी तात्पुरते कारागृह तयार करण्याबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते.

या निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहामध्ये आजपावेतो दाखल झालेल्या सर्व ४०० बंद्यांची कोविड चाचणी आरोग्य विभाग, महानगरपालिका, जळगाव यांचेमार्ङ्गत करण्यात आलेली असून त्यापैकी १८ बंदी हे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. उर्वरित सर्व बंदी हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत.

सर्व बंद्यांची तपसणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाङ्ग यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्ङ्गत सर्व बंद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या १८ बंद्यांपैकी ५ बंद्यांची न्यायालयाव्दारे जामिनावर मुक्तता करण्यात आली असून त्यांना जळगाव शहरातील केविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे.

सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये १३ कोरोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्ङ्गत सुरु आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com