चाळीसगाव : नगरसेवकासह 17 जण क्वारंटाईन

‘त्या’ नगरसेवकांच्या आदोलनात सहभाग

चाळीसगाव : नगरसेवकासह 17 जण  क्वारंटाईन

चाळीसगाव - शहरातील गोपाळपुरा भागात काल सात जण कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आज त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला असून गोपाळपुराभागात राहणार्‍या नगरसेवकासह 17 जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी दिली. दरम्यान परवाच झालेल्या भाजपाच्या आंदोलनात क्वारंटाईन करण्यात आलेल्या नगरसेवकाने सहभाग घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे. त्यामुळे आता ‘त्या’ नगरसेवकांच्या अहवालाची सर्वांना प्रतिक्षा लागली असून अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.

गोपाळपुरा भागात नुकताच एक वृद्ध कोरोना पॉझिटिव आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करुन, त्यांचे स्वँब घेऊन ते तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. पॅाझिटिव्ह सात जणांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांचा आज शोध घेवून त्यांना शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

आज गोपाळपुराभात प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.डी.के.लांडे आदि भेट देवून पाहणी केली. तसेच तो परिसर कनटेन्मेट झोन म्हणून घोषीत केला. आता या संपूर्ण परिसरात 500 मिटरच्या परिसरात आत व बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यापैकी अनेक जण श्रमजीव आहेत. ते रोज शहरातील गर्दीच्या ठिकाणी कामधंद्यासाठी जातात. तसेच कोरोनग्रस्तांच्या संपर्कात आलेला नगरसेवकाल देखील क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. हा नगरसेवक परवा भाजपाच्या आदोलनात सहभागी झाला होता. त्यामुळे त्यांच्या स्वॅबच्या अहवालाची अनेकांना प्रतिक्षा आहे. आता तालुक्यात एकून आठ जण कोरोना ग्रस्त आहेत. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर जवळपास 45 जण कोविड केअर सेन्टरमध्ये क्वारंटाईन आहेत.

एकाची कोरोनावर मात

शहारातील नागदरोड भागातील महिलेने कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधित महिलेवर येथील कोविड केअर सेन्टरमद्ये यशस्वीपणे उपचार झाल्याने ती कोरोनाला मात देवू शकली आहे. महिलेला सोमवारी कोविड सेन्टरमधून घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com