जळगाव :  जिल्ह्यात नव्याने आढळले १६९ रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात नव्याने आढळले १६९ रुग्ण

सहा रुग्णांचा मृत्यू ; एकूण रुग्णसंख्या ५४७१

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात शुक्रवारी एकूण 169 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत पॉझीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 5471 इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पॉझीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 73, ग्रामीण 16, भुसावळ 13, अमळनेर 9, पाचोरा 4, भडगाव 4, धरणगाव 6, यावल 7, एरंडोल 1, जामनेर 10, रावेर 8, चाळीसगाव 4, बोदवड 1, चोपडा 13 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी एकूण 144 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 3223 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 183 अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी एकूण 6 कोरोनापॉझीटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून 2 रुग्णांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर 3 रुग्णांचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाला असून एका रुग्णाचा मृत्यू जामनेर येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जामनेर तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील 26 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष, बोदवड तालुक्यातील 60 व 80 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उपचारादरम्यान 315 रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com