नोंदणी पद्धतीने 154 जण अडकले विवाह बंधनात
जळगाव

नोंदणी पद्धतीने 154 जण अडकले विवाह बंधनात

दरवर्षी होतात चारशेच्या वर विवाह; कोरोनामुळे झाला परिणाम

Balvant Gaikwad

जळगाव - जिल्ह्यात तसेच राज्य भर कोरोना साथरोग प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दि.13 मार्च 2020 पासून सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. यात विवाह समारंभाचा देखील समावेश होता. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात अनेक विवाहेच्छुक युवक-युवतींना जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली होती. तर नोंदणी पद्धतीने देखील अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली होती. जिल्ह्यात दि. पाच मे 20 20 पासून ते 29 जुन 2020 पर्यंत 34 जोडप्यांचे नोंदणी पद्धतीने विवाह पार पडले असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक विजय भालेराव यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या सप्ताहात अच कोरोनाचा प्रकोप वाढू नये यासाठी राज्य शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षांनी सामाजिक सार्वजनिक सभा-संमेलने विवाह समारंभ आदी कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते.

तर कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे एकीकडे जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली, तर दुसरीकडे प्रेमविवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली. जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षात (सन 2016 ते 2020 ) सह जिल्हा निबंधक तथा नोंदणी अधिकारी यांच्याकडे एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 433,. 2017 ते 2018 या कालावधीत 380, एप्रिल 2018 ते 2019 दरम्यान 426, तसेच एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 436 नोंदणी पद्धतीने विवाह पार पडले आहेत. दरवर्षी सुमारे 400 ते 450 विवाह नोंदणी पद्धतीने पार पाडतात असे आकडेवारीवरून दिसून येते.

Deshdoot
www.deshdoot.com