जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक १५ शेतकर्‍यांची ३५ लाखांत फसवणूक

जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक १५ शेतकर्‍यांची ३५ लाखांत फसवणूक

तालुका पोलीसात गुन्हा दाखलः जारगावसह निंभोरा येथील दोघा व्यापार्‍यांनी गंडविले

जळगाव | प्रतिनिधी jalgaon

तालुक्यातील केळी उत्पादक Banana growers १५ शेतकर्‍यांकडून केळीचा माल घेवून व्यापार्‍यांनी By traders ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक Cheating केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक रघुनाथ पाटील Ashok Raghunath Patil रा. निंभोरा ता. रावेर आणि महेंद्र सिताराम निकम रा. जारगाव ता. पाचोरा या दोन व्यापार्‍यांविरोधात बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील सुधीर मधुकर चौधरी रा. पिलखेडा ता. जि.जळगाव हे शेतकरी करून केळीचे उत्पादन घेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुनील चौधरी यांनी १७ आणि २३ फेब्रुवारी २०१९ रोजी केळी व्यापारी अशोक पाटील आणि महेंद्र निकम हे गावात येवून २ लाख ७० हजार १५६ रूपये किंमतीचा कच्चे केळीचे तयार माल दोघांना दिला. परंतू वारंवार तगादा लावूनही दोन्ही व्यापार्‍यांनी सुधीर चौधरी याचे २ लाख ७० हजार १५६ रूपये दिले नाही. त्याचप्रमाणे चौधरी यांच्यासह तालुक्यातील इतर १४ शेतकर्‍यांकडून देखील वेळोवेळी त्यांच्या शेतातून केळीचा तयार कच्चा माल घेवून दोघांनी फसवणूक करून अद्याप पैसे दिलेले नाही.

या शेतकर्‍यांची झाली फसवणूक

सुनील चौधरींसह प्रमोद हरी पवार रा. नंदगाव ता. जि.जळगाव यांचे ३ लाख ७२ हजार २२०, योगराज नामदेव सपकाळे रा. फुफनी ता.जि.जळगाव यांचे ३ लाख १ हजार ७३८, विजय रामकृष्ण सपकाळे रा. फुफनी ता. जि.जळगाव यांचे २ लाख ५० हजार ६०, रतिलाल माणिक पवार रा. भोकर ता.जि.जळगाव ३ लाख ९२ हजार ११३, रत्नाकर शिवलाल सोनवणे रा. देवगाव ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३० हजार ५०५ रूपये, अनिल बाबुराव चौधरी रा. पिलखेडा ता.जि.जळगाव यांचे १ लाख २३ हजार ४२८ रूपये, मोहनचंद नारायण सोनवणे रा. करंज यांचे २ लाख ६५ हजार ९४९, संजय रावण पाटील रा. भोकर ता.जि.जळगाव १ लाख ४७ हजार ६९६, मोहन एकनाथ सोनवणे रा. फुफनी ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३४ हजार ६३५ रूपये, शिवाजी पुरमल पाटील रा. नंदगाव ता.जि.जळगाव यांचे १ लाख ३९ हजार १५६ रूपये, मश्चिद्र झावरू कोळी रा. धानोरा ता.जि.जळगाव यांचे २ लाख ५८ हजार ९७६ रूपये, झेंडू महारू कोळी रा. धार्डी ता. जि.जळगाव यांचे २ लाख ३९ हजार ९०६ रूपये, किशोर देवाजी सोनवणे रा. गाढोदा आणि शिवदास भगवान चौधरी रा. पिलखेडा ता. जि.जळगाव यांचे २ लाख ३४ हजार ६५३ रूपये असे सर्व मिळून एकुण ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या; व्यापार्‍यांची धमकी

१५ शेतकर्‍यांनी गेल्या दोन वर्षांपासून फोनद्वारे पैश्याचा तगादा लावला परंतू अद्यापपर्यंत दोन्ही संशयित व्यापारी अशोक रघुनाथ पाटील आणि महेंद्र सिताराम निकम यांनी एकही रूपये शेतकर्‍यांना दिलेला नाही. यासाठी २० फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व शेतकरी दोघांच्या घरी गेले असता दोन्ही व्यापार्‍यांनी माल देण्यास नकार दिला.

तसेच तुमच्याकडून जे होईल ते करून घेण्याची धमकी दिली. दोन्ही व्यापार्‍यांनी फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर सुधीर चौधरी हे यांच्यासह १४ शेतकर्‍यांनी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही व्यापार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com