हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा
हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले

जळगाव - Jalgaon

हतनूर धरणाचे (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

आज दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता धरणातून (Tapi river) तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, (Jalgaon Irrigation Department) जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com