जिल्ह्यात शनिवारी आढळले 132 कोरोनाबाधित रुग्ण

एक रुग्णांचा मृत्यू ; एकूण बाधितांची संख्या गेली 51 हजार 829 वर
जिल्ह्यात  शनिवारी आढळले 132 कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात शनिवारी पुन्हा नव्याने 132 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 51 हजार 829 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 47, जळगाव ग्रामीणमधील 05 , भुसावळ येथील 32, अमळनेरातील 01 , चोपडा येथील 06, पाचोरा येथील 01, भडगावातील 01, धरणगाव 02, यावल येथील 06, एरंडोल येथील 00, जामनेरातील 18, रावेर येथील 06, पारोळा येथील 00, चाळीसगावमधील 04, मुक्ताईनगरातील 01, बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 01 रुग्णांचा समावेश आहे. .

जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 218 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 2018 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शनिवारी एक रुग्णाचा मृत्यू सारा हॉस्पिटल जळगाव येथे झाला. यात भुसावळ तालुक्यातील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com