रावेर तालुक्यात रविवारी १३ जण पोझिटिव्ह
जळगाव

रावेर तालुक्यात रविवारी १३ जण पोझिटिव्ह

विवऱ्याच्या ७५ वर्षीय आजीबाईने केली कोरोनावर मात

Ramsing Pardeshi

रावेर|प्रतिनिधी-

रावेर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असून ४२ पैकी ३४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले असल्याने, दरोरोज ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. रविवारी विवरा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण १० जण पोझीटीव्ह आले आहे. या व्यतिरिक्त बक्षिपूर येथे २० वर्षीय मुलगी, वाघोड येथे २५ वर्षीय महिला व केऱ्हाळे येथे ४६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

रावेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रविवारी एकूण १३ जण पोझीटीव्ह असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ.एन.डी.महाजन यांनी दिली. यात रावेर शहरातील एकही रुग्णांचा समवेश नाही आहे. पालिकेने राबवलेल्या विविध उपाय योजनामुळे कोरोनाची साखळी तुटल्याने आता शहरातून संसर्ग कमी झाला आहे. रावेर जवळील विवरे बुद्रुक मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या ठिकाणी २१ जण पोझिटीव्ह असून त्यापैकी चौघांची कोरोनावर मात केल्याने घरवापसी झाली आहे. रविवारी आणखी १० जण पोझीटीव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यात १२ वर्षाची मुलगी, ३२, ३६ व ५५ वर्षीय महिला, ६, १४ व १७ वर्षाचे मुल, ४२, ६७ व ७१ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. सर्व पोझिटिव्ह वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहे.

७५ वर्षाच्या आजी बाईचा कोरोनाशी यश्स्वी लढा

विवरे बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांना लागण झाल्याने त्यांची फैजपूर कोविंड सेंटरमध्ये रवानगी झाली होती. यासर्वांनी कोरोनाला यशस्वी लढा दिला आहे. यात ७५ वर्षीय वयोवृद्ध महिला देखील बाधित असल्याने,अधिक चिंता होती मात्र, त्यांनी कोरोनावर यशस्वी लढा देवून मात केल्याने रविवारी त्या घरी आल्यावर गावकरी व वाड्यातील लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

Deshdoot
www.deshdoot.com