जळगाव : टोळीमधील १३ जण हद्दपार

विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत गंभीर गुन्हे
जळगाव : टोळीमधील १३ जण हद्दपार

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील विविध भागांमधील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका टोळीमधील १३ जणांना एका वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिले आहेत.

एमआयडीसी, शहर व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, रस्ता अडविणे, जबरी चोरी करणे अनधिकृतरित्या घरात प्रवेश करणे, दंगा करणे, शस्त्र बाळगून इतरांना दुखापतो करणे, शिवीगाळे, दमदाटी करणे आदी स्वरुपाचे संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

यासंदर्भात शनिपेठ पोलीस ठाणे निरिक्षकांंनी संबंधितांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता.

टोळीचा प्रमुख नीलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे (आसोदा रोड, जैनाबाद), टोळीतील सदस्य रुपेश मनोहर सोनार (मोहन टॉकीज जवळ), मुन्ना ऊर्फ रतिलाल संतोष सोनवणे, युवराज नामदेव सपकाळे (जैनाबाद), श्यामकांत आनंदा कोळी (हरीओमनगर, आसोदा रोड), आकाश युवराज सपकाळे, शुभम रघुनाथ तायडे, गणेश दिलीप सोनवणे (जैनाबाद), अनिल लक्ष्मण घुले (रामेश्वर कॉलनी), संदीप ऊर्फ राधे संतोष शिरसाठ (सुप्रीम कॉलनी), अमोल छगन कोळी, विकी नरेंद्र पाटील (एमआयडीसी), विशाल लक्ष्मण सोनार (अयोध्यानगर) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com