जळगाव : हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडले ; जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात
जळगाव

जळगाव : हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडले ; जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात

धरण क्षेत्रेत ४३.८ मिमी पाऊस

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक दिवसांपासून जिल्हावासिय पावसाची आतुरतेने वाट बघत होते.

गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी नऊ वाजता धरणाचे बारा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे

पावसाळा सुरू झाल्यापासून एक-दोन वेळाच काहीसा पाऊस झाला होता. याच पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांमध्ये केलेली पेरणी वाया गेल्याने बळीराजाला पुन्हा दुपार पेरणीला सामोरे जावे लागले. आधीच करोना महामारीच्या संकटास तोंड देत यंदाचं वर्ष सर्वांसाठी संकटात जात आहे.

आधीच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी हात उसनवारी करत उधारीवर खते, बि-बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र ती मोड आल्याने दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने संकटात भर पडली होती. मात्र आज सकाळपासून जिल्हाभर चांगल्या पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. असाच पाऊस दोन-तीन दिवस सुरू राहीला तर सर्व ओढे, नद्या-नाले भरून वाहू लागतील.

Deshdoot
www.deshdoot.com