विजेच्या धक्याने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू

चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद
विजेच्या धक्याने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील परशुराम नगर (Parashuram Nagar) येथे विजेचा धक्का लागल्याने ११ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव (Chalisgaon Police) पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किर्ती भुषण गुंजाळ (रा. परशुराम नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) (Chalisgaon) असे मयत बालिकेचे नाव आहे. या बालिकेला विजेचा जबर धक्का लागल्याने त्यातच तिचा दुदैवी मृत्यू झाला. तिला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले असता, डॉक्टरांनी तेथे मयत घोषित केले. या घटनेमुळेे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत. वैद्यकीय अधिकारी (Medical officer) यांच्या खबरीवरुन चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com