जिल्ह्यातील पाच तालुक्यात 100 टक्के निकाल
निकालresults

जिल्ह्यातील पाच तालुक्यात 100 टक्के निकाल

बोदवड, चोपडा, धरणगाव, मुक्ताईनगर, पाचोरा तालुक्यांचा समावेश

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

नाशिक विभागातंर्गत जळगाव जिल्ह्याचा 99.94 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये 100 टक्के निकाल असून यात बोदवड, चोपडा, धरणगाव, मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांचा समावेश आहे.

दरम्यान,निकालाची उत्सुकता असल्याने दुपारी 1 वाजतापासून शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर निकाल पाहण्याचा प्रयत्न होत होता.मात्र संकेतस्थळ हँग झाल्याने बराच वेळ निकाल पाहता न आल्याने विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले होते.

करोनाचा संक्रमण असल्याने राज्य शासनाने परीक्षा न घेता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे.अशा सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार दहावीचा शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात दहावीच्या 58 हजार 279 विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यापैकी 58 हजार 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 33 हजार 478 मुले तर 24 हजार 771 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात 9 हजार 321 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 918 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.92 टक्के निकाल लागला आहे. भुसावळ तालुक्यात 5 हजार 19 विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.88 टक्के, बोदवड तालुक्यात 1 हजार 114 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण असून शंभरटक्के निकाल आहे.

भडगाव तालुक्यात 2 हजार 335 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.95 टक्के, चाळीसगाव तालुक्यात 6 हजार 140 विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.96 टक्के, चोपडा तालुक्यात 4 हजार 89 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तर्णी असून 100 टक्के निकाल लागला आहे.

एरंडोल तालुक्यात 1 हजार 997 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 978 विद्यार्थी उत्तीर्ण असून 99.94 टक्के, जळगाव तालुक्यात 2 हजार 704 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 702 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.92 टक्के, जामनेर तालुक्यात 4 हजार 698 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.87 टक्के, मुक्ताईनगर तालुक्यात 2 हजार 105 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के, पारोळा तालुक्यात 2 हजार 732 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 731 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.96 टक्के, पाचोरा तालुक्यात 4 हजार 341 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के निकाल, रावेर तालुक्यात 4 हजार 245 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 243 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.95 टक्के, यावल तालुक्यातील 3 हजार 686 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 683 विद्यार्थी उत्तीर्ण असून 99.91 टक्के निकाल तर जळगाव शहरात 6 हजार 857 विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 854 विद्यार्थी उत्तीर्ण असून 99.95 टक्के निकाल लागला आहे.

24 हजार 422 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत 58 हजार 269 विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी 58 हजार 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 30 विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 24 हजार 422 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. 29 हजार 245 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 4 हजार 477 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 105 विद्यार्थी कमी गुण मिळवीत उत्तीर्ण झाले आहेत.

जि.प.शिक्षणविभाग अशिक्षीतच

दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यातील प्रत्येक विभागनिहाय, जिल्हानिहाय आणि तालुका निहाय निकाल अपलोड करण्यात आला आहे. मात्र तालुका निहाय निकाल नसल्याचे उत्तर माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जि. प. च्या शिक्षणविभागतील शिक्षणाधिकारीच अशिक्षीत असल्याचा प्रत्यय आला.

निकाल न दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा हिरमोड

दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. दुपारी 1 नंतर संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेले संकेतस्थळ हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा हिरमोड झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com