जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

येथील ह.भ.प.संत तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटील समाज मंडळ जळगाव तर्फे वधू वर पुस्तक प्रकाशन रविवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.दरम्यान, शेतकरी व व्यावसायिक मुलांचे 10 रेशीमगाठी जुळून आल्या आहेत.

यावेळी आ.राजुममा भोळे, मनसे तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे, जळगाव समाज मंडळ अध्यक्ष हेमंत भंगाळे, नितीन धांडे, नगरसेविका मीनाक्षी धांडे, महिला समाज मंडळाच्या अध्यक्षा निता वराडे, दिनेश भंगाळे, दीपक धांडे, मराठा समाज अध्यक्ष कडु पाटील चितोडा, संजय मराठे, नगरसेवक जितेंद्र मराठे, प्रकाश वराडे, वसंत कोलते, शिशिर भंगाळे, किशोर कोलते, युवा अध्यक्ष कमलाकर वारके, तुषार वारके आदी उपस्थित होते.

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी प्रास्ताविक करतांना शेतकरी आणि व्यवसाय करणार्या उपवर मुलांना वधू मिळणे अवघड झाले आहे. अशा मुलांसाठी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील उपवर मुलींचा शोध घेउन त्यामुलिंची आपल्या समाजातील मुलांशी सोयरीक जमविण्याचा प्रयत्न असून लवकरच असे किमान 10 विवाह होतील . समाजात प्रबोधन करणारे कार्यक्रम घेण्यासाठीचा मनोदय व्यक्त केला. अॅड. रोहिणीताइ खडसे यांनी प्रत्येक क्षेत्रात संघर्ष अटळ असतो, नाथाभाउनि केला संघर्ष सर्वश्रुत आहे. जळगाव समाज मंडळाला सर्वोतपरि सहाय्य करु असे त्या म्हणाल्या. तर आ. सुरेश भोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात या मंडळाला सहाय्य करण्यासाठी बांधिल आहे.

मंडळाने राबविलेल्या उपक्रमांची प्रशंसा करून असे कार्यक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधूवर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी सोशल डिस्टिंग चे काटेकोर पालन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठि नितिन भोळे, अशोक भारंबे, धर्मराज देवकर, बाबू भंगाळे, प्रशांत महाजन, हेमराज वराडे, सीमा फेगडे, पूनम सावदेकर, देवयानी कोलते, स्वप्नील खडसे, चेतन कोलते भुसावळ. रवींद्र पाटील, ललित पाटील, विशाल सुतार, पवन कोलते, मयूर लोखंडे, निलेश वारके, सुपडु महाजन, गणेश भंगाळे, गणेश धांडे, गणेश पाटील, विष्णु खडसे, नरेंद्र लोखंडे, सोपान कोलते यांनी परिश्रम घेतले.