कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करताना आ चंदू पटेल,आ मंगेश चव्हाण
कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करताना आ चंदू पटेल,आ मंगेश चव्हाण
जळगाव

कोविड सेंटरसाठी आ.चंदू पटेल यांची १० लाखांची मदत

लोकसहभागातून सुसज्ज कोविड सेंटरचे काम प्रगतीपथावर

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgoan - प्रतिनिधी :

तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांना दर्जेदार सुविधा देत कोरोनाशी लढण्याचा विश्वास देणार्‍या सुसज्ज अश्या कोविड सेंटरची उभारणी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. या कोविड सेंटरच्या कामाची पाहणी विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल यांनी केली.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विनंतीवरून आमदार चंदूभाई पटेल यांनी कोविड सेंटर मधील अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले.

यावेळी चाळीसगाव तालुक्याचे तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.पी.बाविस्कर, नायब तहसिलदार विशाल सोनवणे भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन दिनाच्या पावन पर्वावर दि.५ ऑगस्ट २०२० रोजी कोविड सेंटर चे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com