भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

थकित विजबील भरण्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या विज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण करुन धमकावल्या प्रकरणी येथील बाजरपेठ पोलिसात एका विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 19 रोजी कायर्र्रत असतांंना दुपारी 1.45 वाजता घडली.

गंगाराम निळकंठ नन्नवरे यांना विज ग्राहक भास्कर मोरेश्वर सुरे (रा. गांधी नगर भुसावळ) यांना फोन करुन थकित विज बील भरणा केला किंवा नाही याबाबत विचारणा केली. यावेळी सुरे हे बील भरण्यासाठी टाळाटाळ करित होते. तुम्हाला या ठिकाणी यावे लागेल असे सांगितल्यानंत विज कर्मचारी नन्नवरे हे दोन सहकार्यांसह घटनास्थळी गेले असता. तीन कर्मचारी व अभियंता तुषार हिंगणे हे सुरे यांच्या घरी पोहचले यावेळी कर्मचार्यांनी विज कनेक्शन कापण्याबाबत विचारणा केली असता हिंगणे यांनी सुरे यांच्याशी चर्चा करु असे सांगितले. त्यावेळी कर्मचारी विचारणा करण्यापूर्वी सुरे अभियंतांजवळ आले.

अर्ध्या तासात मुलगा आल्यानंतर बील भरण्याचे सांगून ते तेथेच उभे राहिले. दुपारी 4.30 वाजता तुषार भास्कर सुरे हा घटनास्थळी आला. त्याने कर्मचारी व अभियंत्यांशी अरेरावी करत आपण भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष असल्याचे सांगितले. व शिविगाळ करुन दमदाटी करत अंगावर धावून येत गालावर चापटांनी मारहाण केली. यावेळी सहकार्यानी वाद निवळला.

याबाबत वरिष्ठ अधिकारी गोपाल महाजन यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार अभियंता तुषार हिंगणे यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात गु.र.नं.79/21, भा.दं.वि. 353, 332, 504, 506, प्रमाणे तुषार भास्कर सुरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या घटनेचा विज कंपनीच्या कर्मचार्यांनी तीव्र निषेध करुन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी विज कामगार व अभियंते संघटनेचे पदाधिकारी एसईए सहसचिव कुंदन भंगाळे, वर्कस् फेडरेशन सचिव रवि गायकवाड, विज कामगार महासंघ सचिव निलेश बारी, विज तांत्रिक कामगार सचिव मुकेश कोल्हे, विद्युत क्षेत्र तांत्रिक सचिव अशोक भिरूड, बहुजन मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे शैलेश श्रीरामवार यांनी केली आहे. या घटनेची शहरभर चर्चा सुरु होती. दरम्यान कोरोना काळात सक्तीची वसुली शक्य नसल्यामुळे अनेक ग्राहकांना मानसिक ताण वाढत आहे. यातून अशा घटना घडत आहे.