मुकटी येथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

मुकटी येथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील मुकटी येथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. रितेश संतोष पाटील (वय17) हे मयताचे नाव आहे.

नळाला पाणी आले असतांना रितेश संतोश पाटील याच्या हातात इलेक्ट्रीक वायर आल्याने त्याला विजेचा धक्का लागला. त्यात तो बेशुध्द झाला.

त्याला गावातील डॉ. राहूल साळुंके यांच्याकडे उपचारासाठी नेले, परंतू तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

तेथे डॉ. कपील पावरा यांनी तपासून रितेशला मृत घोषीत केले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com