भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

दोंडाईचा - Dondaicha - श. प्र :

घरातील भांडे ठेवण्याचा रॅक सरकवण्यासाठी गेलेला रुपेश मनोज बोरसे (वय 20 वर्षे) रा. गोविंद नगर दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली.

याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रुपेश बोरसे हा तरुण वडिलांच्या भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याने त्यांना तो मदत करत असायचा कुटुंबीयांना उदरनिर्वाहात हातभार लावायचा.

शुक्रवारी दुपारी रुपेश हा रात्री पाऊस झाल्याने घरात पाणी गळत असल्याने ते पाणी भांडे ठेवण्याच्या रॅकवर पडले होते. त्याला सरकवण्यासाठी गेला असता. त्यावेळी सदर रॅक मध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता.

सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेक सरकवण्यासाठी गेलेला रुपेशला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार शेजारच्या व कुटुंबीयांना कळताच त्यांनी त्यास दोंडाईचा रुग्णालयात वाहनांतून हलविले. तपासणी अंती त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जून नरोटे यांनी मृत घोषित केले. त्यावेळी त्याच्या परिवाराने व मित्र मंडळीने एकच हंबरडा फोडला होता.

रुपेशच्या पश्चात आई-वडील, बहिण मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. रुपेश बोरसे हा माजी नगरसेवक रमेश बोरसे यांचा तो पुतण्या होता. दोंडाईचा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com