तापी पुलावरून तरुणाची आत्महत्या

पुलावर मोबाईल व चप्पल ठेवून रडक्या आवाजात भावाला शेवटचा फोन !
तापी पुलावरून तरुणाची आत्महत्या

कुरखळी - Kurkhali - वार्ताहर :

सावळदे तापी पुलावरून नदीत उडी घेवून शिरपूर येथील अंबिका नगरात राहणार्‍या तरूणाने आत्महत्या केली. राहुल रवींद्र पाटील (वय 34) हे मयत तरूणाचे नाव आहे.

दि 3 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता फोन करून तापी पुलावर मोबाईल व चप्पल ठेवून रडक्या आवाजात भाऊ भोला पाटील याला जीवन संपवत असल्याची माहिती त्याने दिली होती. त्यामुळे भावाने नातेवाईक व मित्रपरिवाराला माहिती दिली. त्यानंतर पुलावर गर्दी झाली. राहुलला शोधण्यासाठी सावळदे येथील पट्टीच्या पोहणार्‍यांनी शोधकार्य सुरू केले, घटनास्थळी शिरपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते.

सायंकाळी उशीर झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. पुन्हा सकाळी राहुलचा शोध घेण्यात आला. दोन दिवस उलटूनही राहुलचा शोध लागत नव्हता. शेवटी दि. 5 जुलै रोजी राहुल याचा मृतदेह तापीनदीत तरंगताना दिसून आला. त्यावरून शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुलला कसलंही टेंशन नव्हते, आई आजारी राहत असल्याने लहान भाऊ भोला पाटील यांचा एक महिन्याआधीच विवाह लावून दिला होता. नवीन संसाराची आठ दिवस सुखाची जात नाही तोच आईचे दुर्दैवी निधन झाले, त्यातच पोरक्या झालेल्या लहान भावाला व वहिनीला आधार म्हणून राहुलची भूमिका महत्त्वाची होती. त्यातच राहुलचा आत्महत्येचा निर्णय चटका लावणारा ठरला.

राहुलने भावाला रडक्या आवाजात फोन करून कळविले होते, मी तापी पुलावरून उडी घेत आहे, माझा मोबाईल व चप्पल येथेच पुलावर आहे व फोन ठेवून दिल्यानंतर, भोलाची पायाखालची जमीन सरकली अशातच भोलाने मित्रांना व नातेवाईकांना फोन वरून माहिती दिली, व त्याला शोधण्यासाठी पुलाकडे धाव घेतली.

भोला बाहेरगावी असल्याने त्याला यायला उशीर झाला, जेव्हा भोला घटनास्थळी आला तेव्हा मित्र परिवार व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. राहुलच्या पश्चात भाऊ भोला रवींद्र पाटील, वहिनी, बहिण असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com