तापीनदी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

पट्टीच्या पोहणाऱ्यांनी घेतला शोध
तापीनदी पुलावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

तऱ्हाडी - वार्ताहर Dhule

तालुक्यातील वरुळ येथील तरुणाने तापी नदी (Tapi river) पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला.

पवन छगन मराठे (वय २४ रा.वरूळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने सायंकाळी ५:३०वाजेच्या सुमारास सावळदे येथील तापी नदी पुलावर मोटारसायकल उभी करून तापी नदी पुलावरून उडी घेतली. दरम्यान त्याचा पट्टीच्या पोहणाऱ्यांमार्फत तापी नदी पात्रात शोध घेण्यात आला.

रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉ.आहेर यांनी तपासणी करून पवन मराठे यास मयत घोषित केले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत मदत कार्य केले. मृतदेह सापडेपर्यंत मित्रमंडळी व नातेवाईक घटनास्थळी थांबून होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com