धुळे महापालिका व दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

धुळे महापालिका व दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

धुळे Dhule। प्रतिनिधी

ठाणे महापालिकेेच्या Thane Municipal Corporation सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे Kalpita Pimple, Assistant Commissioner, व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला Assault करण्यात आला. या हल्ल्याचा धुळे Dhule Municipal Corporation महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी तसेच दोंडाईचा Dondaicha नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला असून या निषेधार्थ कामबंद आंदोलन Work stoppage movement करण्यात आले.

ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा धुळे महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांतर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आला. मनपाच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन काळी फिती लावून आंदोलन करण्यात आले. तसेच दोन तास लेखणीबंद आंदोलन देखील करण्यात आले. याबाबत मनपा अधिकारी, कर्मचारी यांच्यातर्फे आयुक्त अजित शेख यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, श्रीमती शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, पल्लवी शिरसाठ, अभियंता कैलाश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, नगर सचिव मनोज वाघ, बळवंत रनाळकर, किशोर सुडके, कार्यालयीन अधीक्षक रमजान अन्सारी, प्रसाद जाधव, कामगार नेते सुनील देवरे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक व सर्व कनिष्ठ अभियंता, अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

दोंडाईचा येथे आंदोलन

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त व अंगरक्षक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोंडाईचा नगरपालिकेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. व कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला व नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कपिल्ता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. एक महिला अधिकार्‍यावर हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकार्‍यांसाठीचे बदल्याचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशाप्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे अधिकार्‍याच्या मानसिकतेवर परिणाम होतात याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त संघटना दोंडाईचा वरवाडे नगरपालीका कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनात प्रामाणिक काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण होते. त्यामुळे अशा गुन्हेगार प्रवत्तीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्य उपाध्यक्ष शिवनंदन राजपूत, स्थानिक अध्यक्ष विवेक ब्राम्हणकर, उपाध्यक्ष लखन कंड्रे, जगदीश पाटील, दिवलेव बागुल, प्रकाश जावरे, शरद महाजन, सुधीर माळी, श्रीपाद नाईक, हर्षल ढवळे,राहुल जाधव आदींनी केली आहे.

आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी दोंडाईचा वरवडे नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना अध्यक्ष संतोष माणिक, उपाध्यक्ष सागर ओतारी, उपाध्यक्ष संवर्ग हर्षल भामरे, शिवनंदन राजपूत, शरद महाजन, जगदीश पाटील, भरत चौधरी स्वर्णा शिंपी, अनिल बागुल, मिनाबाई सपकाळे, रुपेश पाटील, कुणाल, भिकन, कमलेश काळे, महेंद् शिंदे, आनंद चौधरी विवेक धामणकर, राजरत्न, राजकुमार चव्हाण, वासुदेव रडे, धर्मेंद्र मोहिते, शिवा सोलंकी, मिलिंद पिंपळे, शंकर गोयल, उमेश निकम, सागर निकम, कपिल पाटील आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com