धुळ्यात वीज तार पडून महिलेचा मृत्यू

वीज कंपनीच्या हलगर्जीपणाचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
धुळ्यात वीज तार पडून महिलेचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील जय शंकर कॉलनी परिसरात वीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी घडली. यास वीज कंपनीचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सौ.आशा राजेंद्र येवले (वय 48 रा. प्लॉट नं.9 ब, विजय हौसिंग सोसायटी, जय शंकर कॉलनी जवळ, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घंडागाडीत कचरा टाकण्याठी बाहेर आल्या. घंटागाडीत कचरा टाकून घराकडे जात असताना अचानक वीज तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. विजेच्या तिव्र धक्कयाने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान जय शंकर कॉलनीसह परिसरातील लोंबकळणार्‍या वीज तारा काढून तेथे केबल टाकण्यात आली होती. केवळ सौ.येवले यांच्या परिसरातील पोल नं.एफ.44-8,9 आणि 10 या तीन खांबावरच वीज तारा होत्या. या वीज तारा देखील बदलून केबल टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

वार्‍यांमुळे या वीज तारमध्ये ठिणग्या झडत होत्या.त्यामुळे नागरिकांनी याबाबत वेळावेळी वीज कंपनीला सांगितले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यात कालच शहरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला.

विज कंपनीच्या हलगर्जीणामुळेच महिलेचा आपला जिव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर नागरिकांनी विज कंपनीच्या कामाबद्दल रोष व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्याय सौ. येवले याच्या पश्चात सासू, पती, दोन मुली, एक मुलगा, दोन दीर असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com