लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत

धुळे Dhule । प्रतिनिधी

विघ्नहर्ता गणरायाच्या (Ganaraya) आगमनासाठी आज धुळेकरांमध्ये कमालिचा उत्साह (Enthusiasm) आढळून आला. साध्या पध्दतीने उत्सव साजरे करण्याच्या सूचना असल्या तरी पारंपारिक वाद्यांचा वापर करून आणि जयघोष करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना केली.

शहरातील आग्रा रोड, जुने सीव्हील हॉस्पिटल परिसर, इंदिरा गार्डन व देवपूरात ठिकठिकाणी मूर्ती विके्रत्यांनी दुकाने थाटली होती. यंदा मात्र गणेश मूर्तींच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले. आज सकाळच्या टप्प्यात खरेदीसाठी मोठी खरेदी उसळली. दुपारी या आनंदोत्सवात पावसाने हजेरी लावली. त्याशिवाय अधुनमधून कडक उन्हाचाही अनुभव आला.

शहराच्या मानाच्या खूनी गणपतीची मिरवणूक दरवर्षा प्रमाणे पालखीतून काढण्यात येवून टाळ मृदुंगाच्या गजरात स्थापना करण्यात आली. यंदाही मोठे गणपती आणि मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याचे निर्बंध असल्याने सार्वजनिक मंडळाने देखील साध्या पध्दतीनेच गणरायाची स्थापना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com