धुळ्यात वीकेण्ड लॉकडाऊनचा फज्जा

धुळ्यात वीकेण्ड लॉकडाऊनचा फज्जा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शासनाने करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध जाहीर केले असून शनिवार व रविवारी विकेेंड लॉकडाऊन लागू केले आहे. परंतू धुळेकरांना कोरोनाचा विसर पडला आहे. धुळ्यात कोरोनाची संख्या घटत असली तरी धोका मात्र कायम आहे.

पोलीस व्यवसाय बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. परंतू व्यावसायिक व नागरीक पोलिसांचे ऐकत नाही. आज विकेंड लॉकडाऊनचा पुर्ण फज्जा उडला असून सर्व व्यवहार सुरु असल्याचे दिसून आले.

राज्य शासनाने दुसरी व तिसरी लाट रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाची आहे. त्यांना पोलीस यंत्रणेने मदत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

परंतू शहरात विकेंड लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. नेहमीप्रमाणे रस्त्यांवर गर्दी दिसून आली. तर व्यवहार रोजप्रमाणे सुरु असल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

तसेच भाजी व फळे विक्रेत्यांनीही हातगाडी पाचकंदील चौक, आग्रारोड, संतोषी माता चौक, कुमारनगर, दत्तमंदीर चौक, जयहिंद चौक व अन्य चौकांमध्ये हातगाडी लावली होती. पोलिस व्यवहार बंद करावा म्हणून रस्त्यांवर उतरले होते. परंतू पोलिसांच्या आव्हानाला व्यावसायिकांनी धुडकावून लावले. तर हातगाडी विक्रेत्यांनी चोरुन लपून व्यवहार केला.

विकेंड लॉकडाऊन केवळ नावाला न पाळता व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु ठेवावा असा सूर देखील शहरात ऐकण्यास मिळाला.

करोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अद्याप दुसरी लाट संपली नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतू नियमांचे पालनच होत नसल्यासे दिसून येत आहे.

तसेच महापालिका प्रशासन त्यांची जबाबदारी विसरल्याचे लॉकडाऊनच्या उडालेल्या फज्जावरुन दिसून येत आहे. आयुक्तांची जबाबदारी असतांना त्यांनी पथके तयार केली नाहीत. की पथकांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असा प्रश्न निर्माण होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com