वाडी शेवाडी धरणातून बुराई नदीत सोडले पाणी

बुराई काठावरील गावांना मिळणार दिलासा
वाडी शेवाडी धरणातून बुराई नदीत सोडले पाणी

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी प्रकल्पातील पिण्यासाठी असलेले आरक्षित पाणी आज आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते सोडण्यात आले.

यावेळी चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसींग गिरासे, पंचायत समिती सदस्य दिपक मोरे, रणजीत गिरासे, जयसिंग गिरासे,धनराज माळी, बाजार समिती उपसभापती अनिल गायकवाड, माजी पं.स. सभापती डॉ.दीपक बोरसे, भीमसिंग गिरासे, जखाणे सरपंच बंटी बागूल, उपसरपंच गुलाब पाटील, कोमलसिंग गिरासे, अमराले उपसरपंच भैय्या पाटील, डॉ.अमोल बोरसे, परसामळ सरपंच नारायणसिंग गिरासे, निशाणे सरपंच विनायक पाटील, दिलीपसिंग गिरासे, आरावे सरपंच संजय गिरासे, दिलीप धनगर, चिमठाणे येथील योगेंद्रसिंग गिरासे, राजेंद्र बागले, प्रकाश जैन, देगाव येथील दगेसींग गिरासे, सरपंच पिन्टू पाटील, शेवाडे येथील कोमलसिंग टेलर, अर्जुन कोळी,संदीप कोळी, शरद मोरे, पाटबंधारे विभागाचे उपभियंता महाले, अभियंता खैरनार आदी उपस्थीत होते.

बुराई प्रकल्पातील 145 दलघफु पाणी 20 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून बुराई नदी काठावरील व वाडी शेवाडी प्रकल्पाच्या परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती, यासाठी प्रकल्पातून पाणी सोडावे अशी मागणी आ. रावल यांनी पत्राद्वारे केली होती.

ती मागणी त्वरित मान्य करून आरक्षित पाण्यातून 120 दलघफु पाणी सोडावे असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता, आज आ. रावल यांच्या हस्ते बुराई नदीत, पान नदीत तसेच डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. यामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com