स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेला कचरा ठेका रद्द

अधिकारी आणि पदाधिकार्‍यांची चौकशी करा, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेला कचरा ठेका रद्द

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेने स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेला कचरा ठेका रद्द करण्याचा आदेश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून या संदर्भात संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांची चौकशी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. याबाबत आ. फारुख शाह यांनी ना. शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला.

शहरातील कचरा संकलन करणार्‍यासाठी महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीशी सोबत करारनामा केला होता. शहराची लोकसंख्या अंदाजे 4 लाख असली तरी लॉकडाऊनच्या काळात देखील महापालिका क्षेत्रात 200 टन कचरा जमा झाल्याचे खोटे सांगितले.

त्यात देखील अनेक वार्डात आजही घंटागाडी कचरा घेण्यास जात नाही. कचर्‍याचे वजन वाढावे म्हणून सदर करारनाम्याचे उल्लंघन करून वॉटर ग्रेस कंपनी कचर्‍याचे वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत कचर्‍याच्या ऐवजी रेती, माती, दगड, डेब्रेज भरत होती. अशा तक्रारी आहेत.

वॉटरग्रेस कंपनीवर कारवाई करण्याऐवजी दुसर्‍या एका स्वयंभू ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीला महापालिकेने 60 टक्के वाढ करून ठेका दिला आहे. सदरची वाढ नियम बाहय असून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेला ठेक्याला अनेक नगरसेवकांचा विरोध असून सदर कचरा ठेका नियमबाह्य असल्याने रद्द करावा व ठेका देणार्‍या काही अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या चौकशीचे आदेश ना. शिंदे यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com