शिंदखेड्यात पावसाची प्रतीक्षा, शेतकर्‍यांकडून पिकांची मशागत

शिंदखेड्यात पावसाची प्रतीक्षा, शेतकर्‍यांकडून पिकांची मशागत

शिंदखेडा Shindkheda | प्रतिनिधी

शिंदखेडा परिसरात शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा Waiting for rainलागली असून शेतकर्‍यांनी पिकांची मशागत cultivating crops by farmers सुरू केली आहे

ऑगष्ट महिना अर्धा संपत आला आहे. थोड्या पावसावर पिकाची लागवड करूनही पीक परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पिकाची वाढही खुंटली आहे, पाऊस नसल्याने रासायनिक खतही पिकांना देता येत नाही. वाढीसाठी युरियाचाही वापर करता येत नाही, अतिशय दयनीय अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे

शिंदखेडा परिसरासह तालुक्यात कापूस, मका पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पाच टक्के बागायती क्षेत्र आहे. बाकी सर्व पावसावर अवलंबून आहेत. जून महिन्यात पावासाने हजेरी लावली नाही. साधारणपणे पाऊस येतोच या अंदाजाने शेतकर्‍यांनी पेरणी केली तर जूनच्या शेवटी व जुलैच्या सुरुवातीस काही प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे लागवडी करण्यात आली. मात्र आज पावेतो पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सध्या पीक परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पिककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांसमोर कर्जफेड करण्याचा प्रश्‍न उभा आहे. त्यात पिकविमा बाबत किमान पन्नास टक्के शेतकर्‍यांनी पिकविमा काढला नाही. कारण विमा कंपन्या वेळेवर नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करतात असे अनुभव शेतकर्‍यांचा आहे.

शेतात पिकांसाठी निंदणी करण्यासाठी मजुर मिळत नाही. मजुरांना शेतात व काम संपल्यावर गावापर्यत सोडण्यास शेतकर्‍याला रिक्षा किंवा पिकअप वाहन करावे लागते. तेही एक दिवसाचे भाडे चारशे ते पाचशे रुपये घेतात. मजुरांचा प्रमुख वीस माणसांच्या मागे एक दिवसाची मजूरी शेतकर्‍यांकडून घेतो व काम करणारे मजूर सकाळी नऊ वाजता कामावर येऊन दुपारी दोन वाजता परत येतात. त्यात एका मजुरांची मजुरी एकशे पन्नास रुपये घेतली जाते. गवत उचलून फेकणारे दोनशे रुपये मजुरी घेतात सोबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेतकर्‍याला करावी लागते.

शिंदखेडा परिसरातील शेतकर्‍याच्या शेतात कापूस निंदणी सुरू होती. सदर शेतकर्‍यांने ही व्यथा सांगितली. त्यांची एकूण पाच परतन शेती आहे म्हणजे एकवीस ते बावीस बिघे जमीन आहे. आज पर्यंत किती खर्च झाला यावर त्या शेतकर्‍यांच्या डोळ्यातून अश्रू येवू लागले. दुबार लागवड केली.

जवळपास प्रथम बावीस थैल्या कापूस बियाण्याच्या घेतले एक थैली किमान सातशे रुपयाला विकत घेतली एकूण पंचवीस थैल्या घेतल्या. त्यासाठी एकूण सतरा हजार पाचशे रुपये खर्च झाले पावसा अभावी दुबार पेरणी तेवढ्याच खर्चाची झाली सोबत मजुरी व रासायनिक खत यासाठी पंचवीस हजार आठशे रुपये खर्च आला आहे. पाऊस पडेल या आशेवर पारंपरिक व्यवसाय सांभाळत आहे पण काय करणार कसे होणार, माझे आज पावेतो एकूण सुमारे एक लाख बावन्न हजार पर्यत खर्च झाला आहे. अशी व्यथा शेतकर्‍याने मांडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com