धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणू बाधित आणि गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास, अशा व्यक्तींना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक नियुक्त अधिकार्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.

धुळे जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला असून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेल्या निर्बंधांबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती स्थानिक अधिकारी तसेच वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येईल. सदर व्यक्ती ही त्यांच्या देखरेखीखाली राहील.

कोविड रुग्णाच्या घराच्या दर्शनी भागात सुरवातीपासून 14 दिवसांसाठी माहितीचा फलक लावण्यात यावा.

गृह विलगीकरण व्यक्तीच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या हालचाली शक्य तितक्या मर्यादित व विना मास्क फिरणार नाहीत याची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.

विलगीकरणाचे कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक नियुक्त अधिकार्यांच्या देखरेखीखाली ठेवावे. अशी सुचना श्री. जगदाळे यांनी दिली आहे.