धुळे। प्रतिनिधी Dhule

शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड गावाजवळ आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बारा चाकी ट्रकने अचानक पेट घेतला. टायर फुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. यात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. महापालिका अग्नीशामक दलाचे 2 बंबांच्या साहाय्याने आग विझवण्यात आली.

अतुल पाटील, पांडुरंग पाटील, श्याम कानडे, अमोल सरगर, या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवून मोठी जीवित हानी टाळली. यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या दुर्घटनेपासून वाचल्याचा निःश्वास सोडला.

वाहन चालक राहुल पाटील यांनी काही क्षणातच बंब आणून आग विझवली. अवघ्या काही मिनिटात घडलेल्या या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. सरपंच उपसरपंचही उपस्थित होते.