उभ्या ट्रकवर कार आदळून, दोन महिला ठार, पाच जखमी

बिजासन घाटात भीषण अपघात
उभ्या ट्रकवर कार आदळून, दोन महिला ठार, पाच जखमी
Breaking News

धुळे । प्रतिनिधी Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात उभ्या ट्रकवर भरधाव कार आदळून भिषण अपघात झाला. त्यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर पाच जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मेनाबाई राहुलराव भाट (वय 26) व सुशिलाबाई सुरेंद्रराव भाट (वय 50) अशी दोघा मयत महिलांची नावे आहेत. तर राहुलराव सुरेंद्रराव भाट (वय 32), सुरेंद्रराव मालचंद्रराव भाट (वय 55), कुणाल राहुलराव भाट (वय 6), लकी राकेशभाट (वय 13) व प्रांजल रामकिसन भाट (वय 5) सर्व रा. वार्ड नं. 14 रामनगर, मालीयोकी ढाली ब्रिजविहार कॉलनी, किसनगढ जि. अजमेर, राजस्थान हे जखमी झाले आहेत. हे भाट कुटूंबिय काल दि. 12 रोजी कारने (आरजे 42 सीए 3864) सेंधव्याकडे जात होते.

त्यादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास कार चालकाला रस्त्यात मध्यभागी इंडिकेटर न लावला उभा असलेला ट्रक (क्र. आरजे 7 जीए 9417) अंधारात न दिसल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली. त्यात कारच्या पुढील भागाचा चक्काचुर होवून दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. तर पाच जण जखमी झाले. जखमींना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी राजेंद्र भाट यांनी शिरपूर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक सागरमल जितूराम बिश्नोई (वय 34 रा. माडीया ता. नोखा जि. बिकानेर, राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉं मांडगे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com