जिल्हा रुग्णालयातील दहा व्हेंटिलेटर वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वित

जिल्हा रुग्णालयातील दहा व्हेंटिलेटर वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वित

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्हा रुग्णालयास मिळालेले दहा व्हेन्टिलेटर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना विषाणू बाधित रुग्णांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयास पीएम केअर निधीतून 11 व्हेन्टिलेटर प्राप्त झाले होते.

व्हेन्टिलेटर कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.

तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनीही संबंधित व्हेन्टिलेटर कार्यान्वित करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते.

त्यानंतर जिल्हा रुग्णालयाने दहा व्हेन्टिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग केले. तसेच भूलतज्ज्ञ डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. निखिल मसणे यांची सेवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग केली. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दहा व्हेन्टिलेटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com