लसीकरणासाठी आपल्या भागातील आरोग्य केंद्रांतच नोंदणी करावी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांचे आवाहन
लसीकरणासाठी आपल्या भागातील आरोग्य केंद्रांतच नोंदणी करावी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी आपापल्या भागातील आरोग्य केंद्रांची निवड करावी.

शहरी भागातील नागरिकांनी ग्रामीण भागात जावून लसीकरण करून घेवू नये. ज्या क्षेत्रासाठी नोंदणी केली असेल त्याच क्षेत्रातील लसीकरण केंद्रांत उपस्थित राहून लस घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.

शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात नोंदणी करून लसीकरण करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ आणि वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी ज्या क्षेत्रातील आरोग्य संस्थेत लसीकरणासाठी नोंदणी केली असेल त्याच क्षेत्रातील आरोग्य संस्थेत जावून लसीकरण करून घ्यावे.

अन्यत्र नोंदणी करू नये. शहरी भागात राहणार्‍या नागरिकांनी शहरी भागातीलच आरोग्य केंद्राची निवड करावी. अशा नागरिकांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात जावून लसीकरणाचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com